न्यूक्लिअस बजेट योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

न्यूक्लिअस बजेट योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत सन २०२५-२६  या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या न्यूक्लिअस बजेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१  जुलै २०२५  पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सुरुवातीला अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५  जुलै २०२५  होती. परंतु, अनेक लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याने विविध संघटनांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन आदिवासी विकास विभागाने ही मुदतवाढ दिली आहे. इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी nbtribal.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालय विकास शाखेशी 07226-224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवेत.

योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीच्या संरक्षणाकरिता तार जाळी, सोलर फेन्सिंग 85 टक्के अनुदान, आदिवासी युवतींना शिलाई मशीन खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच 85 टक्के अनुदान, आदिवासी बचतगटांना मंडप डेकोरेशन, डीजे साऊंड साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी महिला, पुरुष बचतगटांना दालमिल उभारण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या बचतगटांना फिरत्या फास्ट फूड सेंटरसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी लाभार्थ्यांना विविध व्यवसाय यात नळ फिटिंग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, सुतार काम करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी सुशिक्षित युवकांच्या बचतगटांना स्वयंरोजगारासाठी संगणक संच, प्रिंटर, यूपीएस व तत्सम साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी बेरोजगार लाभार्थ्यांना पॉपकॉर्न मशिन साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी महिला, पुरुष बचतगटांना बेकरी प्रोसेसिंग मशिन खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, वैयक्तिक वनहक्क प्राप्त आदिवासी लाभार्थ्यांना तारकुंपण करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी 100 टक्के अर्थसहाय्य देण्यात येते.

लाभार्थी निवडताना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. ऑनलाईन अर्जांनुसार संगणकीकृत यादी तयार करून कागदपत्रे तपासणी करून पात्र-अपात्र अर्जदारांच्या स्वतंत्र याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages