आज लघुसिंचन योजनेसाठी प्रगणना प्रशिक्षण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

आज लघुसिंचन योजनेसाठी प्रगणना प्रशिक्षण


अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या वतीने लघुसिंचन योजनेंतर्गत 'सातवी प्रगणना' आणि 'जलसाठ्याची दुसरी प्रगणना' याबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण आज मंगळवार, 22 जुलै 2025 सकाळी 11.30 वाजता शेगाव नाका येथील अभियंता भवनात होणार आहे.

भौतिक स्तरावर काम करणाऱ्या प्रगणनांना मोजमाप प्रगणनेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षणासाठी तालुकास्तरीय सूची तयार करण्यात आली असून, प्रत्येक प्रगणकाने स्वतःचा लॅपटॉप आणणे बंधनकारक आहे, यामुळे त्यांना तांत्रिक सराव करता येईल. या प्रशिक्षणामुळे लघुसिंचन योजनेतील प्रगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि अचूक होण्यास मदत मिळणार आहे, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages