अल्पसंख्याक उमेदवारांसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम *इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

अल्पसंख्याक उमेदवारांसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम *इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना पोलीस सेवेत भरतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'निवासी पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण' योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना विनामूल्य पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. सन २०२५-२६  वर्षासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती या प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८  लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे, उमेदवार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू अल्पसंख्याक समाजातील असावा, उमेदवार १८  ते २५ वयोगटातील असावा. मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. पुरुषांची उंची १६५  सेंमी आणि महिलांची उंची 155 सेंमी असावी. पुरुषांची छाती न फुगवता 79 सेंमी आणि फुगवून 88 सेंमी असावी, उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.

प्रशिक्षणात महिला उमेदवारांसाठी 30 टक्के जागा आरक्षित आहेत. उमेदवारांनी यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेखाली पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले असल्यास ते या योजनेसाठी पात्र नाहीत. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना याबाबत बाँड पेपरवर स्वप्रमाणित करणे आवश्यक राहील. या योजनेत उमेदवाराने एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घेता येणार नाही.

योजनेत निवडलेल्या उमेदवारांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणामध्ये दररोज 5 तासांचे वर्ग प्रशिक्षण आणि 3 तास 30 मिनिटांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन दिले जाणार नाही. प्रशिक्षणार्थींना गणवेश यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी दोन हाफ पॅन्ट व दोन टी-शर्ट, तर महिला उमेदवारांसाठी दोन टी-शर्ट व दोन फुलपॅन्ट, बुट 1 जोडी, मोजे 2 जोड्या, बनियन 2, दोन, तसेच प्रसिद्ध प्रकाशकांची पोलीस भरतीविषयक पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, दोन वेळचे जेवण, चहा आणि नाश्ता आदी सुविधा प्रशिक्षण संस्थेकडून मोफत पुरविल्या जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी दि. 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोग स्टेडियम, वसंत हॉलमागे, मालटेकडी रोड, अमरावती येथे अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतीसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages