ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत

 

अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधि) : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत मानधन मंजूर करण्यात येतात. त्यानुसार ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांकडून सन २०२५-२६  या वर्षाकरिता दि. ३१ जुलै २०२५  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या लाभासाठी पात्रता ही वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षांने शिथिल आहे. यात कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे असने  आवश्यक आहे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. तसेच वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहणार आहे. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०  हजार रूपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबू होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न मिळत नाही असे कलाकार किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेंतर्गत नसलेले पात्र कलाकार तसेच कलाकार, साहित्यिक हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.

अर्जासोबत पती-पत्नीचा एकत्रित पासपोर्ट आकाराचा फोटो, सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक आणि बँकेचा आयएफएससी कोड क्रमांक साक्षांकीत प्रत, जन्मतारखेचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या समक्ष अधिकाऱ्यांनी रहिवाशी असल्याबाबत दिलेला दाखला किंवा तहसिल कार्यालयाचे रहिवासी अधिवास प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला, रोगाबाबत, अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत, अर्जामध्ये नमुद इतर कलेसंबंधी कागदपत्रे ही मागील १५ ते २० वर्षांतील आवश्यक पुरावे साक्षांकित केलेले असणे बंधनकारक आहे. यासोबतच आधार कार्डची सत्यप्रत, अर्जदाराचे अर्जासोबत कलाक्षेत्राबाबत परिचय पत्र तयार करून त्यामध्ये वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याबाबत उल्लेख करावा, ही सर्व कागदपत्रे प्रस्तावास जोडावीत.

केंद्र, राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त असल्यास सांस्कृतिक संचालनालयाकडून पुरस्कार अथवा साहित्यिक असल्यास साहित्य प्रकाशित झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे, साहित्यिक क्षेत्रात पुरस्कार प्रमाणपत्र प्राप्त असल्यास अर्जासोबत जोडावे. अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे जोडावेत. रेडिओ, आकाशवाणी प्रसारमाध्यमांवर कार्यक्रमाचे सादरीकरण केले असल्यास त्याबाबतच्या सत्यप्रती जोडावी. कार्यक्रम सादर केल्याबाबतचे छायाचित्रे कात्रणे त्यामध्ये अर्जदाराचा कला सादरीकरणाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

निकषांची पुर्तता करणाऱ्या वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांनी परिपूर्ण प्रस्ताव, अर्ज आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने दि. ३१ जुलै २०२५  पर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages