दिव्यांगांसाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 26, 2026

दिव्यांगांसाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन


 

अमरावती, दि.२६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबवले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 सप्टेंबरपासून हे शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे.

 

तालुका पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांच्या माध्यमातून दिव्यांगांना थेट प्रमाणपत्र मिळवणे सोपे होणार आहे. अमरावती आणि भातकुलीसाठी बुधवार, दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गुरुवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे, मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर, गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार, शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर, मंगळवार, दि.  13 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, तिवसा, गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर, शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी, शनिवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे.

 

दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वीच दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड प्राप्त केले असल्यास त्यांनी या शिबिरास उपस्थित राहू नये. तसेच कॅन्सर, हृदयरोग, क्षयरोग आणि इतर गंभीर, दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरासाठी उपस्थित राहू नये, तसेच दिव्यांगांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages