जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 11, 2026

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य



 

*दंडात्मक कारवाईसह परिवहन विभागाची कामे बंद होणार

 

अमरावती, दि.११  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) : प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. एचएसआरपी बसविली नसल्यास दंडात्मक कारवाईसह परिवहन विभागाची कामे बंद होणार आहे.

 

केंद्र सरकारच्या केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसवण्यासाठी शासनाकडून दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे वाहनधारकांनी किंवा शासकीय कार्यालयांनी अद्याप नंबर प्लेट बसवलेली नाही अथवा अपॉइंटमेंट घेतलेली नाही, अशा वाहनांवर दि. 1 जुलैपासून कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे.

 

वायुवेग पथकाद्वारे 1 जुलैपासून मोटार वाहन अधिनियमातील नियम 50 व कलम 177 नुसार थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच एचएसआरपी बसविलेली नाही अशा वाहनांची परिवहन विभागाद्वारे कामे पूर्णपणे थांबवली जातील. यात वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रात बदल, फायनान्सचा बोझा चढवणे किंवा उतरवणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे यांचा समावेश राहणार आहे.

 

 

मात्र ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी बुकिंग केल्याची पावती कार्यालयात सादर केली आहे किंवा ज्यांनी आधीच अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यांची कामे केली जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages