जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी

 


        


कामाच्या ठिकाणी  महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी

अंमलबजावणीसाठी पाऊल

 

अमरावती, दि.7 : जिल्ह्यातील ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी तसेच सीबॉक्स पोर्टलवर त्याची नोंदणी करण्यात यावी असे आवाहन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. ज्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी अशी समिती स्थापन केली नाही व पोर्टलवर नोंद केली नाही त्यांनी तातडीने हे कार्य पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

          महिला व बाल विकास आयुक्तालयाने  कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध ,मनाई आणि निवारण)   अधिनियम २०१३ (पॉश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी या कायद्याच्या कलम -४ अन्वये ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी  सीबॉक्स पोर्टलवर (https://shebox.wcd.gov.in ) करण्याचे  निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी अशा समिती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

          पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी  शासकीय,निमशासकीय व खाजगी  आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे व त्याची नोंद सीबॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक असून सीबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या आस्थापनांनी अद्यापपर्यंत ही कार्यवाही केली नाही त्यांनी ही कार्यवाही पूर्ण करावी तसेच संबंधीत  आस्थापनेवरील पीडित महिलेला  तक्रार नोंदविण्यासाठी  https://shebox.wcd.gov.in ही लिंक कार्यालयाच्या दर्शनी भागात तसेच कार्यालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages