भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात आदिवासी गावांना न्याय मिळणार काय? -ग्रामस्थांचा सवाल* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 14, 2026

भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात आदिवासी गावांना न्याय मिळणार काय? -ग्रामस्थांचा सवाल*

३० वर्षांपूर्वी तुटलेला पूल अद्यापही जैसे थे, रस्ता नादुरुस्त

शिरजगाव कसबा दिनांक १४ मनोहर सुने 

(ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क) 




 चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पाळा ते खोमई या ६  किलोमीटर रस्त्याला व मेघा नदीवरील पुलाला स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात न्याय मिळणार काय? असे पाळा आदिवासी गावांचे नागरिक विचारणा करीत आहे.

बांधकाम विभागाचे अजब नियम

शिरजगाव कसबा हे कार्तिक स्वामीच्या  भुयारातील मंदिरामुळे पवित्र 'ब' वर्गीय तीर्थस्थळ आहे. या गावांमध्ये हिंदू देवतांची अनेक मंदिरे आहे. या गावाच्या जुना बस स्थानका पासून शिरजगाव कसबा खुदांनपुर खोमई  हा रस्ता जात आहे. या रस्त्यावर अर्धा किलोमीटरवर शीतला माता पवित्र तीर्थस्थळ आहे. तर दीड किलोमीटर खुदानपुर येथे पवित्र हनुमान जी चे पुरातन मंदिर आहे. हा दीड किलोमीटर रस्ता जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत येत आहे. तर शीतलामाता देवस्थान समोरून पाळा खोमई पर्यंत रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत आहे. ५ की.मी.पाळा पर्यंत ५ वर्षापूर्वी डांबरीकरण झालेले होते. परंतु अवैध टिप्पर वाहतूक मुळे रस्ता पूर्ण फुटलेला आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निर्देश करीत आहे. पाळा आदिवासी गावाचे समोर खोमई आदिवासी गावाच्या मध्ये मेघा नदीवरील पूल ३० वर्षांपूर्वी तुटलेला आहे. नवीन पूल बांधकाम झाले नाही. व अद्यापही दुरुस्त ही झाला नाही.खोमई व पाळा या आदिवासी गावातील  नागरिकांना शिरजगाव कसबा बाजारपेठेत दैनंदिन जीवनापयोगी वस्तू खरेदी करिता यावे लागत आहे. परंतु रस्ता नादुरुस्तीमुळे दर महिन्याला अपघात घडत आहे.तसेच या रस्त्यावरील खोमई हे गाव मध्यप्रदेश व पाळा हे गाव महाराष्ट्रामध्ये येत आहे हे विशेष. 

केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरीचे  २ वर्षांपूर्वी व चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांचेही १  वर्षांपूर्वी पत्र.

या रस्त्याचे  बांधकाम सर्वेकरीता केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी २ वर्षांपूर्वी पत्र दिलेले आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागांनी सर्वे करून त्याच वेळेस अहवाल पाठविला आहे. याबाबत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलेले आहे. परंतु पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही.

भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आमच्या आदिवासी गावांना न्याय मिळणार काय ?असे पाळा व खोमई गावांचे आदिवासी नागरिक विचारणा करीत आहे.

प्रतिक्रिया-

१) शिरजगाव कसबा जुना बस स्थानकापासून शितला माता मंदिर ते खुदांनपुर हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत आहे.

रस्ता दुरुस्तीची निविदा झाली आहे. कंत्राटदाराने काम सुरू न केल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येईल.

नितीन झगडे 

उपविभागीय अभियंता 

 जिल्हा परिषद बांधकाम (अचलपूर)अमरावती 

(२) शिरजगाव कसबा ते पाळा , खोमई या २ आदिवासी गाव रस्ता व मेघा नदीवरील पुलाचे बांधकाम बाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचे पत्र आले होते सर्वे करून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. 

प्रमोद वानखडे 

कार्यकारी अभियंता 

सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages