सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ‘एमएसएमई कर्ज वितरण शिबरात उद्योजकांना तब्बल ९० कोटींचे कर्ज वितरीत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 8, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ‘एमएसएमई कर्ज वितरण शिबरात उद्योजकांना तब्बल ९० कोटींचे कर्ज वितरीत


अमरावती, दि. ८ : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच उद्योजकांना सुलभ व जलद कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने  शुक्रवार ७ ऑगस्ट  रोजी  एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन हॉल अमरावती येथे  आयोजित देशव्यापी एमएसएमई कर्ज वितरण शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून या शिबीरात तब्बल ९० कोटींचे कर्ज मंजूर व वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  निलेश निकम होते. तर  प्रमुख पाहुणे म्हणून आशीष सावजी उपस्थित होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप जाधव, राजकुमार तरते, निखिल रंजन आदी उपस्थित होते.

एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या  सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित  या शिबीरात विविध उद्योगांना आवश्यक  कर्ज सुविधा, बँकेच्या विविध योजना तसेच केंद्र व राज्य शासनाच्या एमएसएमई संबंधित योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमादरम्यान एमएसएमई उद्योजकांना  तब्बल 90 कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून स्थानिक उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला  गती मिळणार आहे.

प्रास्ताविक राजकुमार तरते यांनी केले. निलेश वाघमारे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध कर्ज योजना व एमएसएमई उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या वित्तीय सुविधांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित उद्योजकांना कर्ज प्रक्रियेबाबत तसेच विविध योजनांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन  शिवानी ठोकरे यांनी केले तर डॉ. नवनीत इंगळे यांनी आभार मानले.

                                                                   

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages