१० ऑगस्ट रोजी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा’ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

१० ऑगस्ट रोजी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा’

 

अमरावती, दि.६ :  संत गाडगेबाबा शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) एनएसएस हॉलमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरिता  ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

        जिल्ह्यातील सर्व आयटीआय मध्ये फिटर,टर्नर,इलेक्ट्रेशियन,मॅकनिस्ट,टूल डाय मेकर, मशीन मोटर व्हेईकल, डिझेल मशीन, इलेक्ट्रेशियन, वेल्डर (गॅस/इलेक्ट्रीक),ड्रेस-मेकिंग, सुईंग –टेक्नॉलॉजी,फॅशन टेक्नॉलॉजी या विषयांत उत्तीर्ण व अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच पदवी व पदविका धारक (मेकॅनिकल) उमेदवारांसाठी या राष्ट्रीय भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांमार्फत शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.उमेदवारांनी या भरती मेळाव्यासाठी येताना सोबत बायोडेटा आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायापत्री आणणे आवश्यक आहे.

सर्व इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र , संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी केले आहे. 

                                           

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages