वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 19, 2026

वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात


 शिरजगाव कसबा येथील शुभम बैतुले या युवकाचा  मृत्यू 

दि. १९:- शिरजगाव कसबा



वरूड-मोर्शी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील रहिवासी असलेल्या बैतुले कुटुंबातील शुभम बैतुले या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शिरजगाव कसबा परिसरावर शोककळा पसरली आहे.

 शुभम बैतुले  हा मृत व्यक्ती दुचाकी वरून वरूड-मोर्शी महामार्गावरून नागपूर कडे प्रवास करत असताना  दि. १७ ऑगस्ट, मंगळवार रोजी सकाळी ५ ते  ६ च्या दरम्यान हा अपघात घडला. महामार्गावरील एका धोकादायक वळणावर  वरुड वरून येणाऱ्या चारचाकी वाहनाचा अंदाज न आल्यामुळे किंवा तीव्र गतीमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारची व दुचाकी ची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात मृतकाचे हातपाय तुटून वेगळे झाले असून त्याचा जागीच मुत्यू झाला. हे चित्र अंगावर काटा आणणारे होते.
 शुभम बैतुले याचा अपघातात मुत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच बेनोडा पुलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली  तर या घटनेचा पुढील तपास बेनोडा पुलिस कडून करण्यात येत आहे. 
 



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages