नवीन सेवार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचर्णीच्या निराकरणासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष शिबिर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

नवीन सेवार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचर्णीच्या निराकरणासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष शिबिर



अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नवीन सेवार्थ प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात 12 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान विशेष तांत्रिक मार्गदर्शन व समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज करताना डाटा मायग्रेशन प्रणालीचा वापर तसेच विविध प्रक्रियांच्या अंमलबजावणीशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण वेळेत होऊन कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे, या उ‌द्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाशी संबंधित तांत्रिक अडचणींची आवश्यक माहिती व तपशील सोबत घेऊन तसेच स्वतःचा लॅपटॉप सोबत घेऊन शिबिरास उपस्थित राहावे.

            शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व आवश्यक तांत्रिक सहकार्य उपलब्ध होणार आहे. सर्व संबंधितांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या कार्यालयाशी संबंधित तात्रिक अडचणींचे वेळेत निराकरण करून घ्यावे व नवीन सेवार्य प्रणालीतील कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages