आमदार प्रतापदादा अडसड यांची भाजप अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी निवड; जल्लोषात स्वागत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 5, 2026

आमदार प्रतापदादा अडसड यांची भाजप अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी निवड; जल्लोषात स्वागत

अमरावती : दिनांक ६ (ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क)

 भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी आमदार आदरणीय प्रतापदादा अडसड यांची निवड झाल्याबद्दल अमरावती येथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल तसेच ग्रामीण भागातील पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.या स्वागत समारंभाला भारतीय जनता पक्षाचे शिरसगाव कसबा येथील माजी जिल्हा परिषद सभापती तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्यासह अनेक स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांनी आमदार प्रतापदादा अडसड यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत पक्ष बळकटीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages