महिला अधिकाऱ्यांसाठी 2 सप्टेंबरला ‘वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन’कार्यशाळेचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

महिला अधिकाऱ्यांसाठी 2 सप्टेंबरला ‘वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन’कार्यशाळेचे आयोजन


 


अमरावती, दि.१४ (ग्रामीण  उदय न्यूज नेटवर्क):
जिल्ह्यातील गट 'अ' आणि गट 'ब' संवर्गातील महिला अधिकाऱ्यांसाठी 'वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन' विषयावर 2 सप्टेंबर 2026 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

            विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या निर्देशानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्व शासकीय कार्यालयांचे जिल्हा प्रमुख व विभागीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त गट ‘अ’ आणि  गट ‘ब’ संवंर्गातील महिला अधिकाऱ्यांचे नामनिर्देशन करावे असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक श्यामकांत मस्के यांनी केले आहे.

 

            ही कार्यशाळा बुधवार 2 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेच्या योग्य नियोजनासाठी उपस्थितांची नावनोंदणी https://forms.gle/kHPQmVacwgpCD6aP7 या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages