दिल्ली दि.२० :-
NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या 'चलो संसद' आंदोलनाला आज हिंसक वळण लागले असून, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (२० जुलै २०२६) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांनी या महामोर्चाचे आयोजन केले होते.
NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या 'चलो संसद' आंदोलनाला आज हिंसक वळण लागले असून, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (२० जुलै २०२६) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांनी या महामोर्चाचे आयोजन केले होते.
नीट (NEET-UG) प्रवेश परीक्षेत झालेली प्रचंड अनागोंदी आणि पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थी गेल्या काही आठवड्यांपासून आक्रमक आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या अनेक दिवसांपासून जंतर-मंतरवर अनिश्चितकालीन उपोषणाला बसले होते. प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दिल्ली पोलिसांनी या संसद मार्चला अधिकृत परवानगी नाकारली होती. नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ (जमावबंदी) लागू करण्यात आले होते.
सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (DMRC) राजीव चौक, जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटेरिएट आणि सेवा तीर्थ या ५ महत्त्वाच्या मेट्रो स्टेशन्सचे दरवाजे प्रवाशांसाठी तात्पुरते बंद केले होते.
दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरातील काही भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती.
हजारो विद्यार्थी आणि तरुण आंदोलक जेव्हा मंडी हाऊस मेट्रो स्टेशनकडून जंतर-मंतरच्या दिशेने कूच करत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी प्रचंड बॅरिकेडिंग केले होते. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.
पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि 'थाळी-चमचे' वाजवून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि इतर काही विद्यार्थी नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन उपायुक्तांच्या कार्यालयात नेले आहे.
या आंदोलनाला Samajwadi Party च्या खासदार डिंपल यादव, आम आदमी पार्टी (AAP) चे नेते आणि काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाठिंबा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होताच विरोधकांनी NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ केला.
वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या (DCP) माध्यमातून CJP च्या कोअर कमिटीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आंदोलकांनी जिल्हा दंडाधिकारी किंवा सचिवांसोबत चर्चा करण्यास नकार दिला असून, थेट पंतप्रधान किंवा कॅबिनेट मंत्र्यांसोबतच संवाद साधू अशी भूमिका घेतली आहे.
सध्या जंतर-मंतर आणि Tolstoy Marg परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात असून परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.