अंबाडा दि. २० :-
अंबाडा नगरीत प्रथमच श्री संत गुणवंत बाबा टेकडी दरबार अंबाडा येथे यावर्षी २० ते २७ दिवसीय निःशुल्क बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. परिक्षा आटोपली अन डोक्यावरच अभ्यासाच ओझ हलक झाल. विद्यार्थ्यांकरीता नावीन्यपूर्ण उपक्रम राबवुन नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न या शिबिरांमधुन केला जातो. संस्थान मधील या शिबिरातील दिवसांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले, जसे की रोज सुर्यनमस्कार, योगा, प्राणायाम रोज वेगवेगळी आसने त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवन कसे जगावे याबाबत मार्गदर्शन तासिका या शिबिरामध्ये घेण्यात आल्या. रोज विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहार यामध्ये केळी, टरबुज, खरबुज, चिकु, अंगुर या फळाचा नाश्ता देण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाकरीता गावतून ग्राम प्रदक्षिणा सुद्धा काढण्यात आली
या शिबिरा ला आणेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे साहेब , त्याच प्रमाणे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर साहेब , माजी आमदार देवेंद्र भुयार साहेब , त्याच प्रमाणे संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी भेटी दिल्या
त्याच प्रमाणे खासदार साहेबांनी या संस्थानला तीर्थक्षेत्र ब दर्जा कसं प्राप्त करता येईल या साठी पाठपुरवा आपल्या माध्यमातून करू असे आश्वासन सुद्धा दिले .