"अदानी समूहाला इशारा देणारे महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे निलंबित" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

"अदानी समूहाला इशारा देणारे महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे निलंबित"

अमरावती दि. १:-

 महावितरणच्या पालघर परिमंडळाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांना अदानी एनर्जी सोल्यूशन्सला अनाधिकृत पत्र पाठवल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी वरिष्ठांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अदानी समूहाच्या कंपनीला पत्र लिहून स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवला होता. 

मदन सांगळे यांनी अदानी एनर्जी सोल्यूशन्सला एक पत्र पाठवले होते, ज्यात त्यांनी असा इशारा दिला होता की ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत. 


जर ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलले आणि त्यामुळे जनतेमध्ये रोष किंवा आंदोलन निर्माण झाले, तर त्याची पूर्ण जबाबदारी अदानी कंपनीची असेल, असा इशारा त्यांनी या पत्रात दिला होता.

 महावितरणच्या मते, बाहेरील खाजगी कंपनीशी थेट संपर्क साधणे आणि शासकीय धोरणाविरोधात भूमिका घेणे हे प्रशासकीय नियमांचे उल्लंघन आणि गंभीर शिस्तभंग आहे. 

 कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांनी मदन सांगळे यांच्या निलंबनाचे अधिकृत आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) सध्या संपूर्ण राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवत आहे. मात्र, अनेक ग्राहक संघटना आणि नागरिकांनी याला विरोध केला आहे:
अनेक ठिकाणी जुने मीटर काढून सक्तीने स्मार्ट मीटर लावले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.
 स्मार्ट मीटरमुळे वीज देयके वाढतील, असा संभ्रम काही ग्राहकांमध्ये आहे.
 केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (CEA) नियमांनुसार, स्मार्ट मीटर बसवणे सर्वांसाठी बंधनकारक नसल्याचा दावाही काही संघटना करत आहेत. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages