बाहेर चहा पिऊ नका.
पनीर, चीझ, दही, खवा, पेढे बासुंदी आणि इतर दुधाचे पदार्थ निदान दोन चार महिने तरी बाहेरन आणू नका.
कोणत्याही हॉटेल मध्ये पनीर चीझ, खवा, आइसक्रिम आणि दुधा पासून बनवीत असलेले पदार्थ खाऊ नका.
आज विधानसभेत कात्रज डेअरीच्या संचालकाचा पुतण्या भेसळ मध्ये अडकला आहे असे सांगितले आहे. निम्मे पुणे आणि आजूबाजूचा परिसर कात्रज डेअरीच्या दुधावर अवलंबून आहे.
बहिष्कार घाला. स्वतःचे आरोग्य मुलाबाळांचे आरोग्य जपा. नाही पनीर चीझ, खवा, बासुंदी खाल्ले तर बिघडत नाही.
दुध नाही पिले तर आपण मरत नाही.
दर तासाला अर्ध्या तासाला बाहेर जाऊन चहा पिणे बंद करा.
जपान मधील लोक असं काही झालं तर त्यावर बहिष्कार घालतात.
पावला पावलावर चहा टपऱ्या, अमृत तुल्य, मोठ्या चहा हॉटेल चेन इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुध येते कुठून 🤔
नका तिकडे फिरकू.
------------------------------
वरील शब्दरचना
👆लोकहितार्थ आहे.....
सामाजिक कळवळ्याने ओतप्रोत भरलेली आहे..
प्रश्न हा आहे __
केवळ दुधातच भेसळ केली जाते असे नव्हे तर बहुतेक सर्व अन्नपदार्थ भेसळयुक्त आहे.....
एकटे मुंडे साहेब धिरोधात्त वृत्तीने भेसळखोरांना वठणीवर आणत आहे..
पण येथे एक मुद्दा उपस्थित होतो __
महाराष्ट्र राज्याचा लोकहितार्थ कारभार करण्यासाठी __
विधानसभा आणि विधान परिषद मिळून जवळपास ५०० आमदार आहेत....
सक्षम मुख्यमंत्री आणि त्यांच्या दिमतीला भलेमोठे मंत्रीमंडळ आहे....
जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी सत्ताधार्या कडे असते.....
त्याबद्दल त्यांना योग्य सोईसवलती आणि मानधन सुद्धा मिळते....
असे असताना एकटे मुंडे साहेब जीवाची बाजी लावून भेसळखोरांना _
दे माय धरणी ठाय
याची जाणीव करून देत आहे.....
आणि _
सत्ताधीश मात्र डोळ्यावर कातडं ओढून आहे
बरं ही भेसळ केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर आहे.....
काय शुद्ध अन् काय अशुद्ध हेच कळत नसल्यामुळे जनता मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी जे उपलब्ध ते खात आहे.....
ह्यामध्ये जनतेचा काहीच दोष नाही.....
जे काही दोषी अन् गुन्हेगार असतील तर ते आहे __
भेसळखोर आणि त्यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करणारे _ सत्ताधारी
लेखक-
नानासाहेब देवतळे शिरजगाव कसबा
जिल्हा- अमरावती