बांधकाम विभागाच्या लापरवाहीने पांढरीतील २ नागरिकांचा २९ जून पुराचे पाण्यात वाहून जाऊन मृत्यू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, July 12, 2026

बांधकाम विभागाच्या लापरवाहीने पांढरीतील २ नागरिकांचा २९ जून पुराचे पाण्यात वाहून जाऊन मृत्यू



शिरजगाव कसबा 

दिनांक १३  (ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क)

२९ जूनला शिरजगाव कसबा समोर पाळा भागामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने मेघा नदी व चारघड नाल्याला पूर आलेला होता, या पुरामध्ये पांढरी गावाकडे जात असताना पुराचे पाण्यात वाहत जाऊन पांढरी गावातील २ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.

शिरजगाव कसबा, पांढरी गावाकडे जाणाऱ्या नाल्यावर पूल नसल्याने रवींद्र आवारे व गोपाल निर्वार या नागरिकांचा बांधकाम विभागाच्या लापरवाहीने बळी गेलेला आहे. या नाल्यावर बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले असते तर या नागरिकांचा बळी गेलेला नसता यामुळे बांधकाम विभागाने या नागरिकांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी.  शिरजगाव कसबा, पांढरी गावाकडे जाणाऱ्या तसेच शिरजगाव कसबा, कुऱ्हा गावाकडे जाणाऱ्या याच नाल्यावर तात्काळ  २ पुलाचे बांधकाम करावे अशी पांढरी गावाचे नागरिकांनी मागणी केली आहे. दरम्यान अचलपूर मतदार संघा चे आमदार प्रवीण तायडे यांनी मृतक कुटुंबीयांचे घरी जाऊन भेट दिली आहे व बांधकाम विभागांला निर्देश दिले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages