"सिनेमा सिनेमा खेळताना" एकदिवसीय निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, July 12, 2026

"सिनेमा सिनेमा खेळताना" एकदिवसीय निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन संपन्न

 



बिइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् चा उपक्रम.

अमरावती, १३ जुलै २०२६

चित्रपट, नाटक, वेब सिरीज आणि न्यूज चॅनेल यांसारख्या माध्यमांमध्ये रोजगार, व्यवसाय आणि नोकरीच्या संधी शोधणाऱ्या कलाकारांसह विद्यार्थ्यांना चित्रपट उद्योगाची तांत्रिक ओळख आणि निर्मितीचे पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी, अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित बिइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती येथे "सिनेमा सिनेमा खेळताना" या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन काल रविवारी, 12 जुलै 2026 रोजी करण्यात आले आहे. असे आवाहन अकॅडमीच्या संचालिका स्नेहा वासनिक यांनी केले आहे

चित्रपट तसेच माध्यमाच्या रीतसर शिक्षणानंतर शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सरकारी कार्यालये, खाजगी संस्थामधे करियर च्या संधी, तसेच फेलोशीप्स, स्कॉलरशिप, अर्थ सहाय्य मिळविण्याचे विविध मार्ग आणि चित्रपट उद्द्योजकता जनगृती करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून चित्रपट निर्मितीची प्रक्रीया, निर्माता, कथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, प्रकाश योजना, संकलन, ध्वनी, कला दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, जाहिरात व प्रसिद्धी, सेन्सॉर सर्टीफिकेशन, वितरण व्यवस्था,आर्थिक गुंतवणुक व मोबदला या सर्व विभागांची कार्य पद्धती तसेच सिनेमा किंवा चित्रपट म्हणजे काय? कला-व्यवसाय-उद्योग-करियर म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा? यावर चर्चात्मक मार्ग दर्शन करण्यात येणार आहे. तसेच निवळक लघुपटांचे प्रदर्शन आणि निरिक्षनात्मक चर्चा प्रश्नोत्तरातुन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर यांनी सांगितले.




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages