30 दिवसात सर्व समस्या सोडवू - जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आश्वासन
चांदूरबाजार, दि. २८ जुलै:
भारतीय जनता पार्टी चांदूर बाजार अंतर्गत शहरातील क्रीडा संकुलातील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत दि. २७ जुलै ला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा. रमेशभाऊ तायवाडे - तालुका प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मा. प्रवीणभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
यावेळी डॉ. राहुल अहीर - तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूर बाजार, डॉ. अकबर पटेल, सूरजभाऊ बैस - तालुका प्रमुख शिंदे शिवसेना, तिलक ठाकुर, शंभुभाऊ अग्रवाल, संदीप मानमोड़े, राहुल भाऊ बालिंगे, प्रकाश भाऊ झोलेकर, हरीशभाऊ उपाधे, डॉ. निलेश बनाईंत, सहारे मॅडम, पद्माताई दुबे, सुधाताई तंभाखे, लड्डुभाई शेख, पत्रकार संदीप वानखेड़े, अमृत काशिकर, प्रताप गवई, अॅड. राजेश खडसे, राहुल कविटकर, बाबारावजी खडसे, अरुण भाऊ कुलथे, सागर सवले, करण खंडारे, शरद केदार, मदनभाऊ भाटे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
रमेशभाऊ तायवाडे म्हणाले, "क्रीडा संकुल हे तालुक्यातील हजारो विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करणारे युवक आणि क्रीडाप्रेमींसाठी एकमेव आधार आहे. मात्र पाणी, लाईट, स्वच्छता नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे."
निवेदनातील प्रमुख मागण्या:
१. संकुलात पिण्याच्या पाण्याची व प्रकाशाची व्यवस्था करावी
२. स्वच्छता व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहाची सुविधा द्यावी
३. आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग तयार करावा
४. संकुल परिसरातील दारूचे दुकान व कचरा डंपिंग यार्ड तात्काळ हटवावे
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून 30 दिवसाच्या आत सर्व समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनानुसार पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.