शासकीय आदिवासी आश्रम आयटीआय सुर्सदा (ता. धारणी) येथे प्रवेश प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

शासकीय आदिवासी आश्रम आयटीआय सुर्सदा (ता. धारणी) येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
 

 अमरावती, दि. २६  : 'यावे प्रशिक्षणासाठी - निघावे स्वयंरोजगारासाठी' या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, शासकीय आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सुर्सदा, ता. धारणी, जि. अमरावती येथे ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन प्रशिक्षण सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सत्रांतर्गत विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक व्यवसायांमध्ये दर्जेदार प्रशिक्षण मिळवून स्वयंरोजगार तसेच नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सुर्सदा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

            या प्रवेश प्रक्रियेत इंजिनिअरिंग अंतर्गत १० वी पास पात्रतेवर आधारित २ वर्षांचा 'फिटर' (प्रवेश क्षमता २० जागा) आणि 'यांत्रिक मोटार गाडी - मेकॅनिक मोटर व्हेईकल' (प्रवेश क्षमता २४ जागा) हे कोर्सेस उपलब्ध असून सदर अभ्यासक्रम मुले व मुली या दोघांसाठी खुले आहेत. तसेच ८ वी किंवा १० वी पास पात्रतेवर आधारित १ वर्षाचा 'वेल्डर' हा कोर्स (प्रवेश क्षमता २० जागा) मुले व मुलींसाठी उपलब्ध आहे, तर ८ वी किंवा १० वी पास पात्रतेवरच आधारित मुलींसाठी विशेष असलेला १ वर्षाचा 'स्युवींग टेक्नॉलॉजी' हा नॉन-इंजिनिअरिंग कोर्स (प्रवेश क्षमता २० जागा) देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

            या सर्व व्यवसायांसाठी ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी शासनाच्या http://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

            प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सविस्तर तपशीलांसाठी विद्यार्थ्यांनी थेट संस्थेला भेट देऊन प्रवेशासंबंधी माहिती जाणून घ्यावी. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संस्थेचे शिल्प निर्देशक ए. बी. भिलावेकर (९४२२१४१४८७),  जि. एस. भिलावेकर (८२७५९९७९३३), एस. सी. बिसंदरे (८८३०५७४५४६) आणि के. एस. कसबे (७३९१०१९५१५) यांच्याशी संपर्क साधता येईल. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुर्सदा आयटीआय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages