नौदल माजी सैनिक आणि विधवांच्या पेन्शन समस्या निवारणासाठी सोमवारी विशेष शिबिर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, June 14, 2026

नौदल माजी सैनिक आणि विधवांच्या पेन्शन समस्या निवारणासाठी सोमवारी विशेष शिबिर


अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मुंबई येथील 'आयएनएस त्राता, नेव्हल युनिट' (INS Trata, Naval Unit) कडून नौदलाचे माजी सैनिक (Naval ESMs) आणि त्यांच्या विधवा यांच्या पेन्शन तसेच इतर दस्तऐवजांशी संबंधित प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी 'आयएनएस त्राता, नेव्हल युनिट'ची एक विशेष चमू येत आहे. ज्या नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा भगिनींच्या पेन्शन किंवा इतर कागदपत्रांबाबत काही तक्रारी अथवा समस्या असतील, त्यांनी सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे आपल्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages