दि. २६ 'ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ' :-
पत्रकारांना धमकावणाऱ्यांना थेट जेलची हवा मिळणार असून दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
लोकशाहीला आव्हान: पत्रकारांना धमकी देणे म्हणजे थेट लोकशाहीला आव्हान देण्यासारखे आहे.
राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणणे अशा घटनांकडे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल.
लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हा चौथा स्तंभ आहेत. समाजातील विविध प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात.
पत्रकारांवर होणारे हल्ले किंवा दबाव हे केवळ व्यक्तीवर नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे.