अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील विजयी घोषित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील विजयी घोषित

 




जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्याने श्री. पोटे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विजयी उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.

अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील ६ मते अवैध ठरविण्यात आली, तर 421 मते वैध ठरल्याने विजयासाठी प्रथम पसंतीची 211 मतांचा निश्चित करण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत श्री. पोटे यांनी कोट्यापेक्षा अधिक म्हणजे 390 मते मिळविली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांना शून्य मत मिळाले.

निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाíहेब दराडे उपस्थित होते.




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages