'आधी मंदिरे दानपेटी अन आता केबल चोरी!' चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
शिरजगाव कसबा दिनांक १५ डींगाबर सुने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
परीसरातील शिरजगाव कसब्यात विजपंपाचे केबल चोरटे पुन्हा सक्रिय होऊन चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी विजपंप केबल चोरीला गेल्याने शेतकरी हैराण झाला आहे
दि. ११ जूनच्या रात्री धुगाव रोड शेतशिवारातील शुभम दीपक गनोस्कर, रवींद्र श्रीरामजी खाजोने, रामदास मारोतराव खाजोने, सागर सुभाष वाघे, दशरथ मोतीरामजी कुऱ्हाडे यांचे शेतातील ट्यूबवेल व विहिरीतील ६८ फूट श्री फेज केबल चोरट्यांनी लंपास केले. यामुळे मोटर पंप बंद पडून ऐन उन्हाळ्यात शेतीला ओलित करण्यात खंड पडला आहे.
शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून कलम ३०३(२), ३२४/१ अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा केबल चोरटे सक्रिय झाले असल्याचे दिसत असतानाही तपास लागत नाही आहे.
आधी मंदिरे दानपेटी फोडली अन आता मोटर पंप केबल!
काही दिवसाआधी शिरजगाव कसबा परिसरातील खुदानपूर हनुमान मंदिर व शितला माता मंदिर येथील दानपेटीतील रक्कम व आभूषणे चोरट्यांनी लंपास केले. परिसरात जणू एक टोळीच सक्रिय असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहे. यावर जर कारवाई केल्या गेली नाही तर येत्या काही दिवसात चोरीचे प्रमाण वाढण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहे.
महत्वाचे मुद्दे:
१. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार येथे विजपंप केबल चोरी वाढली
२. ११ जून रोजी ५ शेतकऱ्यांच्या विहिरीतील ६८ फूट केबल लंपास केले आहे.
3. उन्हाळ्यात ओलित बंद, शेतकरी अडचणीत
४. यापूर्वी मंदिरातील दानपेटी चोरी, परिसरात टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे.
पोलीस हतबल झाले आहे.