'सिटिंग' नाही, थेट 'फिल्ड'वर: मुंढेंचा विदर्भ-मराठवाडा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 12, 2026

'सिटिंग' नाही, थेट 'फिल्ड'वर: मुंढेंचा विदर्भ-मराठवाडा दौरा



दि. १२ :-
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्तपद हाती घेतल्यानंतर आयएएस (IAS) तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवायांचा धडाका लावला आहे. आता त्यांनी आपला मोर्चा विदर्भ आणि मराठवाडा या दोन मोठ्या क्षेत्रांकडे वळवला आहे. त्यांच्या या अचानक नियोजित दौऱ्यामुळे दोन्ही विभागांतील भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
लोकांच्या थेट आरोग्याशी आणि जगण्याशी निगडित असलेल्या अन्न व औषध क्षेत्रात 'झिरो टॉलरन्स'म्हणजेच कोणतीही हलगर्जी खपवून न घेणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. 
हॉटेल्स, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्न उत्पादनात स्वच्छता व सुरक्षिततेची खात्री करणे.
 औषध पुरवठा आणि अन्न वितरण साखळीत पारदर्शकता आणणे.
 नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा दाखवणे. 
मुंढे यांच्या विशेष पथकांकडून या दौऱ्यात खालील ठिकाणांची अचानक  तपासणी केली जात आहे
 महामार्गावरील मोठे ढाबे, नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते.
 दूध, पनीर, खवा, लस्सी आणि तूप यांमध्ये होणारी रासायनिक भेसळ रोखण्यासाठी विशेष तपासणी.
 डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (Prescription) प्रतिबंधित औषधे विकणारे मेडिकल स्टोअर्स आणि बेकायदेशीर औषध पुरवठादार. 
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या काही दिवसांतच मोठे दणके दिले आहेत: 
गेल्या काही दिवसांतच सुमारे ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा (उदा. आंबे, गुळात साखरेची भेसळ, भेसळयुक्त खवा) साठा जप्त करण्यात आला आहे.
 मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह ७३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची भ्रामक आयुर्वेदिक औषधे आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे.
 नियमभंग करणाऱ्या अनेक संस्थांचे परवाने रद्द करून आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. 
"माझा इतिहास बघावा!" – मुंढेंचा धमकी देणाऱ्यांना इशारा 
या मोहिमेदरम्यान मुंढे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्यांची पत्रे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावर  तुकाराम मुंढे यांनी अत्यंत कडक शब्दांत उत्तर दिले
"धमक्या देऊन माझे निर्णय बदलता येणार नाहीत. धमक्या देणाऱ्यांनी आत्तापर्यंतचा माझा इतिहास बघावा. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना मी सोडणार नाही." 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages