"नरसापूर हादरले! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; ६५ वर्षीय नराधमाला बेड्या" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 4, 2026

"नरसापूर हादरले! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; ६५ वर्षीय नराधमाला बेड्या"

 

दि. ४ 
 नरसापूर - पुण्यातील भोर तालुक्यातील 
नरसापूर (Nasrapur) येथे एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना १ मे २०२६ रोजी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
उन्हाळी सुट्ट्यांसाठी आजीकडे आलेल्या साडेतीन ते ४ वर्षांच्या चिमुरडीला एका ६५ वर्षीय नराधमाने वासनेचा शिकार बनवले. अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता.
आरोपीला अटक: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि भीमराव कांबळे (वय ६५) या संशयित आरोपीला घटनेनंतर केवळ दीड तासात अटक केली. आरोपीला न्यायालयाने ७ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गावकऱ्यांचा संताप व बंद: या घटनेच्या निषेधार्थ नरसापूर आणि भोर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त नागरिकांनी आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली असून पुणे-सातारा महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलनही करण्यात आले.
सरकारची भूमिका: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या वडिलांशी संवाद साधून हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' कोर्टात चालवण्याचे आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कडक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
पीडित पित्याची भावनिक विनंती: "जोपर्यंत माझ्या लेकीला न्याय मिळत नाही आणि नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी सांत्वनासाठी माझ्या घरी येऊ नये," अशी कळकळीची विनंती पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages