शिरजगाव कसबा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करा. १० गावाची मागणी. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 28, 2026

शिरजगाव कसबा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करा. १० गावाची मागणी.

पालकमंत्र्यांना आमदार प्रवीण तायडे यांचे पत्र


शिरसगाव कसबा दिनांक २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

 परिसरातील १० गावांचे नागरिकांची वेळेवर तहसील ची कामे होण्याचे दृष्टिकोनातून शिरजगाव कसबा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे. असे पत्र आमदार प्रवीण तायडे यांनी पालकमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना दिले आहे. 

२००२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव पाटील यांचे आदेशान्वये शिरजगाव कसबा  येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आलेले होते. सद्यस्थितीत हेही कार्यालय बंद आहे. 
करजगाव, कुऱ्हा, लाखनवाडी, कारंजा बहिरम, पाळा, आलमपूर, बोदड,रतनपुर सायखेडा, सर्फापूर, देऊरवाडा, काजळी , या गावांचे नागरिकांची  फेरफार ,दाखले, महसूल विषयक तहसील कामे त्यावेळेस वेळेवर व्हायची. आता नागरिकांना त्रास होत असल्यामुळे मनोहर सुने माजी जि. प. सभापती  यांनी या गावांचे वतीने शिरजगाव कसबा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याकरिता अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांना निवेदन दिलेले होते. अचलपूर मतदार संघातील या गावांचे नागरिकांची होत असलेली गैरसोय, त्रास लक्षात घेऊन आमदार प्रवीण तायडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना शिरजगाव कसबा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याकरिता पत्र दिले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages