*गुरुदेव सेवाश्रमात ग्रामजयंती संपन्न* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, May 3, 2026

*गुरुदेव सेवाश्रमात ग्रामजयंती संपन्न*







अमरावती दिनांक ४ मे २०२६

 गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर अमरावती येथे महाराष्ट्रदिन, कामगार दिन, बौद्धपौर्णिमा व ग्रामजयंती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ हे होते. सकाळी पाच वाजता डॉ.जावरकर व सौ प्रतिभाताई जावरकर यांच्या शुभहस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान होऊन सामुदायिक ध्यानावर श्री. बाबुरावजी धोटे यांचे  भाषण झाले. साडेसहा वाजता गाडगे नगर परिसरातून ग्रामगीताचार्य रामदासजी गायकवाड  यांचे मार्गदर्शनात रामधून काढण्यात आली. रामधुनच्या महत्त्वावर ग्रामगीताचार्य आशाताई धारपवार मॅडम यांनी चिंतन प्रस्तुत केले. साडेनऊ वाजता ह. भ. प. अभियंता दिनकर चोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. साडेअकरा वाजता ग्रामजयंती, महाराष्ट्रदिन, कामगारदिन व बुद्धपौर्णिमा, यानिमित्त डॉ. मोना चिमोटे अधिष्ठाता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. दिलीप काळे अध्यासन प्रमुख संत गाडगेबाबा अध्यासन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोरखनाथ जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगे नगर,एडवोकेट दिलीप कोहळे ,सदस्य अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी सौ. सुरेखाताई लुंगारे नगरसेवक अमरावती महानगरपालिका या अतिथींची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी डॉ सतीश तराळ होते. याप्रसंगी पुरुषोत्तमराव गावंडे, डॉ. शोभाताई गायकवाड. श्री. राजीव बसवनाथे,श्री. चंदनसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी सत्कारमूर्तींनी सत्काराला समयोजित उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ मंदा नांदुरकर यांनी केले. दुपारी दीड वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तीर्थ रामदासजी सदार यांच्या हस्ते उठवण्यात आले. संध्याकाळी सात वाजता सामुदायिक प्रार्थना संपन्न झाली .सामुदायिक प्रार्थनेवर प्रा. नरेंद्र राऊत यांचे भाषण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधर डहाके कार्याध्यक्ष ,रामदासजी सदार कोषाध्यक्ष, प्रफुल मंदा श्रीधर,बकले हरिभाऊ ठाकरे,अनंत हगवणे, इत्यादींनी परिश्रम घेतले ग्राम जयंती उत्सवाला
कडक उन्हातही  गुरुदेव भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages