गोसम्मान अभियानांतर्गत चांदुर बाजार तालुक्यातील गौभक्तांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 3, 2026

गोसम्मान अभियानांतर्गत चांदुर बाजार तालुक्यातील गौभक्तांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर

ब्राम्हणवाडा थडी, विलास खाजोने  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

दि.४

देशभरात राबविण्यात येत असलेल्या गो सन्मान आवाहन अभियान अंतर्गत गोवंश संरक्षण, संवर्धन व सन्मान या महत्वपूर्ण विषयावर भारताचे पंतप्रधान यांच्याकडे सविस्तर व ठोस निवेदन सादर करण्यात आले आहे.

सदर निवेदनामध्ये गोमातेच्या संरक्षणासाठी कठोर व प्रभावी केंद्रीय कायदे तातडीने लागू करावेत, तसेच गोपालन व गोसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात देशातील गोवंशाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले असून, गोतस्करी, गोहत्या तसेच रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या हानीवर तातडीने आळा घालण्यासाठी कठोर आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. गोसंवर्धन हा केवळ धार्मिक आस्थेचा विषय नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, गो आधारित नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळून ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळकटी मिळेल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.

या अभियानाला चांदुर बाजार तालुक्यातील चांदुर बाजार, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, वणी, विश्रोळी, करजगाव ,रिद्धपूर, देउरवाड़ा, काजळी व अन्य  गावांतील गौभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपाल यांना चांदुर बाजार तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनाची केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सदर निवेदन चांदुर बाजार येथील तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी , श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आकाश दाभाडे, शिवम सापधारे, शरद प्रधान, दुर्गेश साबळे, चेतन पोटे, तुषार सातपुते,निलेश दारोकर, व श्री छत्रपती युवा संघ चे अध्यक्ष रोशन खत्री निहाल चावरे, मंगेश आमटे, रोहित वाघमारे, राज चव्हाण, करण आमटे,  प्रज्वल झोलेकर,  अक्षय तायवाडे, नैतिक सूर्यवंशी, प्रतीक पवार, संकेत कानसुले, प्रणव कडू, पियुष परमार, प्रेम चौधरी, विजय कोचेकर, सुजल तायडे, सुमित कुमार, स्वप्निल चव्हाण, विजय चव्हाण, श्याम चव्हाण, सुजल सोळंके, ऋषिकेश पवार, गोलू चव्हाण, आनंद पवार, राजू मकसोरे आदींची उपस्थिती होती.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages