गरिबांची कामे वेळेतच पूर्ण व्हावीत, कामात दिरंगाई चालणार नाही - आमदार प्रवीण तायडे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 19, 2026

गरिबांची कामे वेळेतच पूर्ण व्हावीत, कामात दिरंगाई चालणार नाही - आमदार प्रवीण तायडे


आसेगाव पूर्णा दिनांक २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

       जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन ‘महाराजस्व अभियान’ राबवत आहे. सर्वसामान्यांची कामे सुलभ व्हावीत, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन माननीय आमदार प्रवीण तायडे यांनी केले.

​आसेगाव पूर्णा येथील सूर्यकांता मंगल कार्यालय येथे दि. १८ तारखेला  ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार तायडे बोलत होते.

​यावेळी मंचकावर खालील मान्यवर उपस्थित होते:

​श्री. बळवंत अरखराव (उपविभागीय अधिकारी, अचलपूर)

​कु. सोनल सूर्यवंशी (तहसीलदार, चांदूरबाजार)

​श्री. वानखडे (गटविकास अधिकारी)

​श्री. तेलगोटे (ठाणेदार, आसेगाव पोलीस स्टेशन)

​श्री. मनोज सोनारकर (नायब तहसीलदार)

​श्री. भारत पर्वतकर (मंडळ अधिकारी)

​श्री. कैलास गुळसुंदरे (महसूल अधिकारी)


​आमदार प्रवीण  तायडे यांनी प्रशासकीय यंत्रणेला ठणकावून सांगितले की, "जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याकरिता मी कोणतीही तडजोड सहन करणार नाही. गरिबांची कामे ही विहित वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, जेणेकरून त्यांना वारंवार कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही." कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,

​१५ वर्षांचा प्रश्न सुटला; लाभार्थ्यांना मिळणार सातबारा

​यावेळी उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. आसेगाव येथील ६२ लाभार्थ्यांचे मागील १५ वर्षांपासून 'तुकडे बंदी' कायद्यामुळे फेरफार प्रलंबित होते. या अभियानाच्या माध्यमातून ते मार्गी लावण्यात आले. तसेच याप्रसंगी लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले . जातीचे दाखले  ई राशन कार्ड  डोमेसाईल सर्टिफिकेट तसेच याप्रसंगी  पांदन रस्त्या  बाबत मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहे.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी  विलास ढोले यांनी केले  तर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता   ग्राम महसूल अधिकारी विपुल ठाकरे, मोहन पाखरे, मेहेर कपूर, प्रमोद खैरकर, रूपाली गावंडे, दीक्षा बेठेकर महसूल अधिकारी सुमित सोनवणे , अंकुश काळे तसेच महसूल सेवक  केतन भालेराव, आशिष वैराळे यांनी परिश्रम घेतले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages