अमरावतीच्या 'साई वेदांत' रुग्णालयातील डॉ. आदित्य डागा यांना आंतरराष्ट्रीय सन्मान; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

अमरावतीच्या 'साई वेदांत' रुग्णालयातील डॉ. आदित्य डागा यांना आंतरराष्ट्रीय सन्मान;

जपानमधील जागतिक परिषदेसाठी मानाची 'ट्रॅव्हल ग्रँट'


दि. २३ ​अमरावती: शहरातील प्रसिद्ध साई वेदांत रुग्णालयातील (Saai Vedanta Hospital) सुप्रसिद्ध

एंडोक्रायनोलॉजिस्ट (हार्मोन विकारतज्ज्ञ) डॉ. आदित्य डागा यांच्या वैद्यकीय संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर

दखल घेण्यात आली आहे. जपानमधील क्योटो शहरात होणाऱ्या २२ व्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ

एंडोक्रायनोलॉजी (ICE 2026) या जागतिक परिषदेत संशोधन सादरीकरणासाठी डॉ. डागा यांना आमंत्रित

करण्यात आले असून, त्यांना ;इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एंडोक्रायनोलॉजी ची अत्यंत प्रतिष्ठित अशी ISE ट्रॅव्हल

ग्रँट (ISE Travel Grant) मंजूर झाली आहे.

​डॉ. आदित्य डागा यांनी 3β-Hydroxysteroid dehydrogenase type-2 deficiency: Our experience

and gonadal function-focused systematic review या अत्यंत दुर्मिळ जनुकीय आणि अंतःस्रावी

(हार्मोनल) आजारावर सखोल संशोधन केले आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित केईएम (KEM)

रुग्णालयात उच्चशिक्षण घेत असताना पूर्ण केले होते. केईएम रुग्णालयातील या दर्जेदार संशोधनाला आता

जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

​ही भव्य आंतरराष्ट्रीय परिषद २ ते ६ जून २०२६ दरम्यान जपानमध्ये पार पडणार आहे. जगभरातील निवडक

शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनाच या परिषदेत सादरीकरणाचा बहुमान मिळतो. या प्रतिष्ठेच्या ट्रॅव्हल ग्रँट अंतर्गत डॉ. डागा

यांच्या परिषदेची नोंदणी फी, तसेच जपानला जाण्या-येण्याचा प्रवास आणि निवासाचा संपूर्ण खर्च आंतरराष्ट्रीय

संस्थेकडून कव्हर केला जाणार आहे.

​डॉ. आदित्य डागा हे आता अमरावतीकर झाले असून, ते सध्या साई वेदांत  रुग्णालयातून विदर्भातील रुग्णांना

आपल्या अद्ययावत वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल ‘साई वेदांत’

रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापनाने त्यांचे विशेष सत्कार आणि कौतुक केले आहे.

यानिमित्ताने बोलताना ‘साई वेदांत’ रुग्णालयाच्या अध्यक्षांनी सांगितले की, “डॉ. आदित्य डागा

यांच्या या यशामुळे केवळ आपल्या रुग्णालयाचेच नव्हे, तर संपूर्ण अमरावती शहराचे नाव

जागतिक वैद्यकीय नकाशावर झळकले आहे. त्यांनी केईएमसारख्या नामांकित संस्थेत केलेले

संशोधन आणि आता साई वेदांत रुग्णालयाच्या माध्यमातून ते देत असलेली सेवा, ही अमरावती

परिसरातील रुग्णांसाठी अत्यंत अभिमानाची आणि फायद्याची बाब आहे. त्यांच्या पुढील जागतिक

वाटचालीस आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

या यशाबद्दल शहरातील वैद्यकीय वर्तुळातून आणि नागरिकांमधून डॉ. आदित्य डागा यांच्यावर

अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages