क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती


 अमरावती दि. २३ :-


क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमास अमरावती येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जोशी हॉल, श्याम चौक परिसरात सोमवार, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 03.30 वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजातील विविध घटकांतील नागरिक, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती माधुरी निमजे, महाप्रबंधक, बी.एस.एन.एल., अमरावती उपस्थित होत्या. प्रमुख व्याख्याते मा. श्री. पैगंबर शेख (पुणे) यांनी “शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा – सर्वांगीण भारताची मूलभूत गरज” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक समता, शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच मा. श्री. दिलीप सोळंके (अमरावती) यांनी “फुले-आंबेडकर यांचा विवेकवाद आणि सद्यस्थिती” या विषयावर विचार मांडताना आजच्या सामाजिक परिस्थितीत या विचारांची गरज अधिक असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती चंदा महतो (लेखाधिकारी) यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले. प्रास्ताविक श्रीमती अतिंदर कौर (कनिष्ठ राजभाषा अधिकारी) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती भावना महाजन (कार्यालय अधीक्षक) यांनी केले.
बी.एस.एन.एल कर्मचारी संयुक्त जयंती कृती समिती, अमरावती यांच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमामुळे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages