अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १६७० कोटींचा व्याज परतावा वितरीत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १६७० कोटींचा व्याज परतावा वितरीत



*१.७७ लाख तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने प्रगतीचा नवा टप्पा गाठला आहे. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील १ लाख ७७ हजारांहून अधिक तरुण उद्योजकांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली असून, तब्बल १ हजार ६७० कोटी रुपयांचा व्याज परतावा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

महामंडळाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ या एकाच वर्षात सर्वाधिक ५८८.६९ कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला आहे. पारदर्शक प्रक्रिया आणि 'थेट लाभ हस्तांतरण'मुळे लाभार्थ्यांचा महामंडळावरील विश्वास वाढल्याचे चित्र दिसत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लाभार्थ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी महामंडळाने दोन महत्त्वाच्या सुविधा सुरू केल्या आहेत. यात महामंडळाच्या संकेतस्थळावर चोवीस तास उपलब्ध असलेल्या चॅटबॉटद्वारे १५ हजार ५०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी कागदपत्रे आणि पात्रता याबाबत शंकांचे निरसन केले आहे.

तसेच ८९७६८५५९२१या व्हॉट्सॲप सेवेमध्ये आता लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती, पात्रता प्रमाणपत्र अपडेट्स आणि व्याज परताव्याची माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. तसेच, नवीन शासन निर्णयांसाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप चॅनेलही कार्यान्वित करण्यात आले आहे.

महामंडळाच्या वाढत्या व्यापाचा विचार करून नवी मुंबईतील पनवेल येथे अत्याधुनिक मुख्यालय उभारण्यात येणार आहे. सिडकोने या प्रकल्पासाठी सुमारे दिड एकर जागा केवळ एक रुपया प्रति चौ.मी. या नाममात्र दराने मंजूर केली आहे. या प्रस्तावित इमारतीत प्रशासकीय कार्यालयासोबतच निवासी प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास विभाग, डिजिटल सेवा केंद्र आणि संशोधन सुविधा उपलब्ध असतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages