ग्रामीण भागातील विवेक अजाबराव मनवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून संगणक शास्त्र विषयात आचार्य पदवी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

ग्रामीण भागातील विवेक अजाबराव मनवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून संगणक शास्त्र विषयात आचार्य पदवी


विवेक अजाबराव मनवर 

अमरावती दिनांक 23 बाबाराव खडसे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)


        संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभागातून विवेक अजाबराव मनवर (रा. चिंचोली काळे, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) यांनी "On the Query Refinement system using Word Sense Disambiguation in Bilingual Queries" या विषयावर संशोधन करून यशस्वीरित्या आचार्य पदवी प्राप्त केली आहे.

या संशोधनाच्या काळात विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागाचे डॉ. अविनाश बा. मनवर यांनी मार्गदर्शन केले. निकाल जाहीर झाल्यानंतर विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद अतीक, परीक्षक डॉ. पराग भालचंद्र आणि विभागातील सर्व प्राध्यापकांनी विवेक यांचे अभिनंदन केले.

विवेक यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील,पत्नी सौ. प्रतीक्षा मनवर, भाऊ-बहिण संपूर्ण परिवार, मार्गदर्शक डॉ. अविनाश मनवर, मित्र आणि सहकाऱ्यांना दिले आहे. ग्रामीण भागातून येऊन उच्च शिक्षण आणि संशोधन पूर्ण करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

संगणक शास्त्रातील बाइलिंग्वल क्वेरी रिफाइनमेंट आणि वर्ड सेन्स डिसएमबीगेशन (WSD) या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे संशोधन मराठी-इंग्लिशसारख्या भाषांमध्ये माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला अधिक अचूक आणि उपयुक्त बनवू शकते.

ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या यशाबद्दल विवेक मनवर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages