नवीन पानखेल पाळा शिरजगांव कसबा शेतीमधील इलेट्रिक लाईन बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

नवीन पानखेल पाळा शिरजगांव कसबा शेतीमधील इलेट्रिक लाईन बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

 


पाणपिंपरी, कांदा, संत्रा पिकांचे ५० टक्के नुकसान
 

शिरजगाव कसबा दिनांक २३  चंदन धाकडे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 


 ‌‌.  शिरजगाव कसबा परिसरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सावकारी करीत असून शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे.   वीज नसल्याने शेतीचे ५० टक्के नुकसान झाले असून कार्यालयात तक्रार  घ्यायलाही कोणी नसल्याने शेतकरी रडकुंडीला आलेला आहे.

गावाचे नवीन पानखेल पाळा  शेती भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पाणपिपरी, कांदा व संत्रा या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके कोमेजुन गेली आहे.

या गंभीर समस्येबाबत तक्रार करण्यासाठी शेतकरी महावितरण (वीज वितरण) कार्यालयात गेले असता, तेथे कार्यालय बंद असल्याचा अनुभव आला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिकच नाराजी निर्माण झाली आहे. “आम्ही तक्रार द्यायला गेलो, पण ऑफिसच बंद होतं. मग आमचं ऐकणार कोण?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याचा तीव्र कालावधी सुरू असून पिकांना नियमित पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र वीज नसल्यामुळे मोटारपंप बंद आहेत आणि पाणी देणे पूर्णपणे थांबले आहे. यामुळे कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे, तर संत्रा बागांमध्ये फळगळ वाढत आहे.

यासोबतच, तक्रार नोंदवण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कार्यालय बंद असल्याने ना अधिकारी उपलब्ध आहेत, ना कोणती मार्गदर्शनाची सुविधा. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची मागणी आहे की:

तात्काळ वीजपुरवठा सुरू करावा

महावितरण कार्यालय नियमित वेळेत सुरू ठेवावे

तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन किंवा अन्य सुविधा उपलब्ध करून द्यावी

झालेल्या शेती नुकसानीसाठी योग्य नुकसानभरपाई द्यावी

जर लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात आली नाही, तर या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages