*नगर राजभाषा कार्यान्वयन समिती, अमरावतीच्या माध्यमातून आकाशवाणीवरून राजभाषा हिंदीचा प्रचार-प्रसार अमरावती* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, March 12, 2026

*नगर राजभाषा कार्यान्वयन समिती, अमरावतीच्या माध्यमातून आकाशवाणीवरून राजभाषा हिंदीचा प्रचार-प्रसार अमरावती*


 दि. १२ :- 

राजभाषा हिंदीचा प्रभावी वापर वाढावा तसेच तिचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (न.रा.का.स.), अमरावती यांच्या माध्यमातून एक विशेष मुलाखत कार्यक्रम आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे. ही समिती भारत सरकार गृहमंत्रालय राजभाषा अंतर्गत कार्य करते. या कार्यक्रमामध्ये राजभाषा धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात न.रा.का.स. अमरावतीचे अध्यक्ष श्री श्यामसुंदर नेमा, अपर आयुक्त, आयकर विभाग यांची “न.रा.का.स.ची गरज आणि कार्यपद्धती” या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. तसेच न.रा.का.स.चे सचिव श्री नितीन सावरीक, सहायक निदेशक (राजभाषा), बीएसएनएल यांची “राजभाषा अधिनियम, 1976” या विषयावर मुलाखतही प्रसारित केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आकाशवाणी अमरावतीचे श्री आशिष गावंडे असतील.
भारताच्या संविधानातील कलम 343 नुसार संघाची राजभाषा हिंदी व लिपी देवनागरी निश्चित करण्यात आली आहे. राजभाषेच्या अंमलबजावणीसाठी पुढे राजभाषा अधिनियम 1963 आणि त्याअंतर्गत राजभाषा नियम 1976 लागू करण्यात आले. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर वाढवणे, पत्रव्यवहार हिंदीत करण्यास प्रोत्साहन देणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये राजभाषेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.
याच पार्श्वभूमीवर देशातील विविध शहरांमध्ये नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्या आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्र शासनाच्या कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँकांमध्ये राजभाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कार्य करतात.
हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होणार आहे. श्रोते हा कार्यक्रम FM 101.5 MHz वर तसेच News on Air मोबाईल अ‍ॅपवर देखील ऐकू शकतील.
नगर राजभाषा कार्यान्वयन समिती, अमरावती आणि आकाशवाणी अमरावती यांच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेला हा कार्यक्रम राजभाषा हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी आणि शासकीय कार्यालयांमध्ये हिंदीच्या वापराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages