प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, March 12, 2026

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित

     कृषी संचालक रफिक नाईकवाडी
  

 

राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभ

समारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

        अमरावती दि.१२  :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता प्रधानमंत्री नंरेद्र मोदी यांच्या  हस्ते 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आसाममधील ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी येथून वितरित होणार अशी माहिती कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

            केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक मदत देण्यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयेप्रमाणे एकूण 6 हजार रुपये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जातात.

            महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्त्यांमधून सुमारे 39 हजार 300 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी भूमी अभिलेख नोदंणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे तसेच ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करणे या बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

            सद्यस्थितीत राज्यातील या तीनही बाबी पूर्ण केलेल्या सुमारे 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 13 मार्च रोजी सुमारे 1,837 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

            या कार्यक्रमानिमित्त राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (ईपीसी एस), शेतकरी उत्पादक संघटना (ईपीओ एस) तसेच सहकारी पतसंस्था (पीएसीएस) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

            कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages