गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट येथे ईद मिलन सोहळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 20, 2026

गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट येथे ईद मिलन सोहळा


 अमरावती दिनांक २०.  गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर अभियान व जमाते इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


 हा ईद मिलन सोहळा रविवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी चार वाजता गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधा नगर अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. ईद मिलन सोहळ्याचे उद्घाटन गाडगे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोरखनाथ जाधव हे करणार असून याप्रसंगी अतिथी म्हणून डॉ. दिलीप काळे, वसंतराव वंडलकर, गजेंद्र सुरकार, अनिता काशी, मिर्झा गफार बेग रफिक अहमद , लाईक अहमद व राजीव बसवनाथे हे उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम संयोजक प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, मो. अफसर भाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages