समाजामधील अंधश्रद्धा आणि राजकारण (महिला जागृती गरज ) - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 20, 2026

समाजामधील अंधश्रद्धा आणि राजकारण (महिला जागृती गरज )

   दि.२१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

आपल्या देशामध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच थोर संत गाडगेबाबा होऊन गेले आहे.त्यांनी त्यांच्या जीवनातून आपल्याला शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहित केले संत गाडगेबाबा यांचा झाडू पंजाब रावांचा खडू आणि संत तुकडोजी महाराजांची खंजिरी ने समाज परिवर्तनाच्या चळवळीची पायाभरणी केली असे थोर संत आणि त्यांची शिकवण आपल्या पाठीशी असताना समाज त्यापासून दूर जात आहे. राजकीय हव्याशा पोटी नेते काही  महिलांच्या माध्यमातून भोंदू बाबा समोर लोटांगण टाकत आहे.  रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदाचे आदर्श असणाऱ्या या देशांमध्ये  मुलींची अब्रू लुटणाऱ्याचे शेकडो पुरावे मिळाल्यानंतर शिक्षा झालेले आसाराम, राम रहीम, वीरेंद्र दीक्षित असे कितीतरी भोंदू बाबांची उदाहरणे आपल्यासमोर आहे. काही नेते यांच्या मागे लागतील त्यांचे समर्थन करतील असा  विशिष्ट वर्ग  आपल्या समाजामध्ये आहे. ते अशा लोकांना पाठीशी घालत आहे .ही घृणास्पद बाब आहे. आता नव्याने उघडकीस आलेले भोंदू अशोक खरात प्रकरण बघता या गलिच्छ राजकारण्यांची लाज वाटत आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालता समाजातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला पाहून सर्वसामान्य  समाज त्यांचे आचरण करीत असतो तेव्हा पुढील पिढीच्या भवितव्यासाठी तरी अशा पाखंडी बाबांचा पर्दाफाश होऊन कारनामे उघड करायलाच पाहिजे आणि अशा लिंग पिसाट बाबांच्या अनिष्ट रूढींच्या आहारी जाण्यापेक्षा देव हा मनुष्यातच आहे.आपले कर्म, कामे चांगली करावी माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्यावी. असा संदेश संत गाडगेबाबांनी आपल्याला दिलेला आहे. थोडक्यात काय स्वतःच्या डोक्याने विचार करा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर केवळ लोकांचा लोंढा  जातो म्हणून आपण त्यांच्या मागे जाणे ही फार मोठी चूक आहे.  महिलांनी आपली बुद्धी प्रामाणिक वापरून चिकित्सा बुद्धीने  कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर प्रामाण्यवाद जपुन पावले टाका, कोणत्याही विषयाच्या आहारी जाण्या अगोदर विचार करा. हे विज्ञान युग आहे. 


सौ. सुरेखा दामेधर 

अध्यक्ष

विदर्भ (पश्चिम )महिला  मंच

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages