तहसीलदार साहेब नाही तहसीलदार म्हणा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 16, 2026

तहसीलदार साहेब नाही तहसीलदार म्हणा

 










 शालेय उपक्रमांतर्गत क्षेत्रभेटीदरम्यान तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे पीएम श्री सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद

दि. १७ धारणी

धारणी  स्थित पीएम श्री सेमी इंग्रजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळेंच्या  सहशालेय उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले या क्षेत्रीय भेटी अंतर्गत तालुक्यातील तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आदी स्थळांना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्यात  भेटीदरम्यान धारणी  तहसीलचे तहसीलदार प्रदीप शेवाळे व तालुका कृषी अधिकारी उमेश यादव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधित चर्चा करून तालुक्याची माहिती सामायिक केली हि बाब सर्वांना आश्चर्य करणारी होती, तालुक्याचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यातील विद्यार्थी जीवन जिवंत होत विद्यार्थ्यांशी  मिसळून कार्यालयातील सर्व विभाग व इतर तालुक्यातील ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली, यावेळी नायब तहसीलदार राजेश माळी व वरिष्ठ लिपिक निलेश सपकाळ सुद्धा उपस्थित होते, मोठ्या पदावर असताना आपल्या सामान्यपणाची जाणीव करीत तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना साहेब म्हणू नका फक्त तहसीलदार म्हणा. अशा शब्दात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना एका विद्यार्थ्याने तहसीलदारांना आपले वेतन किती असाही सवाल केला, तहसील कार्यालयातील क्षेत्रीय भेट ही विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाने आनंद निर्माण करणारी होती. तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला कृषी विभागातील विविध नेऊन फळझाडे, पिकांविषयी व विविध कृषी विषयक आवश्यक असणाऱ्या सर्व माहिती देत कृषी विभाग हे मानवी जीवनातील महत्त्वाचे आणि अविभाज्य घटक आहे, भारत देश हे कृषिप्रधान देश असून कृषी विभाग नाही राहिला तर माणसाचे जगणे अशक्य होईल अशा शब्दात कृषी विभागाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन कृषी विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली, पोलीस ठाणे येथे लोकांना जेलबंद कसे करतात ते ठिकाण दाखवा असे  विद्यार्थ्यानी विचारले,  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभुदास बिसंदरे, सहाय्यक शिक्षिका नूतन गैलवार, सीमा भुजाडे, बंशीलाल कासदेकर, आणि ऋतिका आदीनी सहकार्य केले. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages