शिरजगाव पोलीस स्टेशन कर्मचारी वसाहत बांधकामाचा पोलीस विभागाला विसर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 13, 2026

शिरजगाव पोलीस स्टेशन कर्मचारी वसाहत बांधकामाचा पोलीस विभागाला विसर

 

शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन कर्मचारी वसाहत (क्वार्टर)जागा

जागेत सर्व काटेरी झाडे ,पोलीस कर्मचारी रिक्त पदे व अपडाऊन प्रवास

शिरजगाव कसबा, दिनांक१४ डींगाबर सुने 

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

 स्थानिक पोलीस स्टेशन कर्मचारी वसाहत जागेत २० वर्षापासून बांधकाम न झाल्याने कर्मचाऱ्यांना बाहेरगावातून अपडाऊन प्रवास करावा लागत आहे.  गृहमंत्र्यालय पोलिसांनाच निवास बांधकाम करून देत नसेल तर कायदा व सुवसुव्यवस्थेचे काय? सर्वसामान्य नागरिकांना कसा न्याय  मिळणार आहे.

अमरावती ग्रामीण पोलीस विभागात अत्यंत संवेदनशील शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन असून यामध्ये शिरजगाव कसबा, करजगाव, देऊरवाडा ही ३ मोठी गावे तर देऊरवाडा , सर्फापुर , कारंजा बहिरम, रतनपुर सायखेडा, पाळा , मांगीया , खरपी ही ७ लहान गावे अशी  १० गावे समाविष्ट आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत करजगाव येथे १० डिसेंब १९९२ ला जातीय दंगल, शिरसगाव कसबा येथे ९ जुलै १९९० व ३० एप्रिल १९९४ ला क्षुल्लक कारणावरून दंगली झालेल्या आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्रात नावाजलेली सर्वात मोठी बहिरम यात्रा डिसेंबर ,जानेवारी महिन्यामध्ये भरली जात आहे. तर देऊरवाडा मध्ये बालाजी उत्सव ,लाखनवाडीला श्री संत गुणवंत महाराज जन्मदिवस, पुण्यतिथी महोत्सव तसेच शिरसगाव कसबा नोव्हेंबर मध्ये कार्तिकी स्त्रींजठा उत्सव मध्ये लाखो भाविकांची उपस्थिती असते शिरजगाव कसबा, देऊरवाडा ,लाखनवाडी ही ३गावे महाराष्ट्र शासनाने" ब' वर्गीय तीर्थस्थळ मंजुरी केली आहे.

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला  १एपीआय, ३ पीएसआय,५ एएसआय व इतर ३६पदे एकूण मंजूर पदे असताना या ठिकाणी १ एएस आय व इतर  ८ पदे रिक्त आहे.

या संवेदनशील पोलीस स्टेशन अंतर्गत करजगाव येथे२० वर्षापासून पोलीस चौकी ची मागणी असताना पोलीसगृह मंत्रालयाने लक्ष दिले नाही.ही शोकांतिका असल्याची करजगाव नागरिकांची ओरड आहे.

पोलीस कर्मचारी वसाहत करिता महसूल प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायत मार्फत ११,४००चौरस फुटाचे १४ प्लॉट २००६ मध्ये दिलेले असताना व तत्कालीन पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस कार्यालयाला पाठपुरावा केल्यानंतरही व पोलीस अधीक्षकांनी गृह मंत्रालयाला माहिती दिल्यावरही अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा न केल्याने शिरजगाव कसबा पोलीस कर्मचारी वसाहत जागेत बाभळी काटेरी झाडे वाढलेली आहे.

संवेदनशील असलेल्या शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन च्या कर्मचारी वसाहत बांधकामाची पोलीस गृहमंत्रालयाने दखल न घेणे हे कोडे असून पोलीस विभाग पोलिसांनाच न्याय देत नसेल तर सर्वसामान्यांना कसा न्याय मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages