ब्राम्हणवाडा थडी _
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क (विलास खाजोने)दि.१७-
पोलीस स्टेशन ब्राम्हण वाडा थडी येथे पोलिस प्रशासन व महसूल विभागाने दोन टिप्पर अंदाजे तिस बर्रास वाळू अवैध वाहतूकदाराकडून पकडून ती पोलीस स्टेशनचे आवारामध्ये तिन महिन्यांपूर्वी जमा केली. १२ मार्चला नायबतहसीलदार मनोज सोनारकर,मंडल अधिकारी भरत पर्वतकर व तलाठी फुटाणे यांच्यासह भा.ज.पा.कार्यकर्ते मुरली माकोडे व दोन व्यक्ती पोलीस स्टेशनचे आवारामध्ये आले.व तहसीलदार यांनी गावांमध्ये मुनादी न देता ती वाळू तिस हजार रुपयांमध्ये जाहीर केले.याबाबतची कुणकुण गावकर्यांना लागताच येथिल बदुकले व वसुले त्याठिकाणी येवून आम्हाला वाळू पाहिजे हर्रास बोला असे म्हणताच तुम्ही उशिरा आले . हर्रास झाला असे म्हणून त्यांची बोळवण केली परंतु ते यांनी तेथे धांदल केल्याने अखेर ती वाळू न विकता त्यांना परत जावे लागले व मुनादी देवुन वाळूचा हर्रास होईल असे म्हणावे लागल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे.
Post a Comment
0 Comments