भारुडाच्या माध्यमातून कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती; जनुना येथे महिला मेळावा संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 12, 2026

भारुडाच्या माध्यमातून कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती; जनुना येथे महिला मेळावा संपन्न


अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जनुना ग्रामपंचायत येथे आरोग्य प्रबोधनाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी गावातील वृद्ध महिलांसोबत भारुड सादर केले. या माध्यमातून कुष्ठरोग आणि क्षयरोगाविषयी संदेश देण्यात आला.

यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी शास्त्रीय माहिती देत, कुष्ठरोग हा शाप नसून तो पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात भारुड आणि भजनासोबतच अभिनय हायस्कूलच्या निबंध स्पर्धा विजेत्यांचा आणि रांगोळी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी महिलांना झाडांच्या कुंड्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच जगदीश नरखेडकर व ग्रामसेवक जयश्री काकडे यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात, 'लवकर निदान आणि त्वरित उपचार' या सूत्राद्वारे गाव कुष्ठरोग व क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.

--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages