(14 फेब्रुवारी *व्हॅलेंटाईन डे निमित्ताने)
लेखिका_ कंचन मुरके
असं म्हणतात, प्रेम एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, दिवसाची ,जागेची,गरज नसते. ३६५ दिवस हे प्रेमाचेच परंतू व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय, असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. प्रेमाच्या व्याख्या ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे बनविल्या आहेत,कोणी त्याला पुजा म्हणतो तर कोणी प्रेमाला त्याग समजतं
अर्थात हया व्याख्या म्हणजे ज्यांचा त्यांचा अनुभवांचा एक भाग आहे.
आज कुठल्याही मॉलमध्ये, कॅफेमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये, ‘तो’ आणि ‘ती’ बनिधास्तपणे हातात हात घालून मस्तपैकी आढळतीत. मात्र आजच्या पिढीचं ऑनलाइन प्रेम कधी ऑफलाइन होतं, त्यांनाही कळत नाही. हे देखील तेवढेच सत्य. कुठे हे आजच्या स्मार्ट पीढिचं प्रेम आणि कुठे ते एका नजरेसाठी आसुसलेलं प्रेम. आज प्रेमाची परिभाषाच बदलली की काय, असा प्रश्नच पडतो. तू नही तो और...!
पाडगावकर म्हणायचे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पूर्वी मॉल, कॅफे असलं काही नव्हतं, मग ‘तो’ आणि ‘ती’ भेटणार तरी कुठं, तर शाळेत, देवळात, महाविद्यालयात, शिकवणीत. वह्यांची देवाणघेवाण व्हायची आणि सुरू व्हायचा प्रेमाचा सिलसिला. ते चोरून पाहणं, ते लाजणं, त्यात खूप प्रेमळ भावना होत्या, आतुरता होती. खूप प्रेमवीरांना तर प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्गच सापडायचा नाही, मग कुणी गुपचूप ‘तिच्या’ बेंचवर किंवा फळ्यावर ओळी लिहिणार, तिच्या यायच्या रस्त्यावर खडूने बदामाच्या आकारात तिचं नाव लिहिणार, फारच तर तिच्या गल्लीतून सायकलवर पाचसहा चकरा मारणार. तरी डाळ नाही शिजली तर मग थेट प्रप्रोज करणार. एकदा का तिकडून ग्रीन सिग्नल मिळाला की तो आणि ती एकमेकाला असं काही जपायचे की बस, अब सब कुछ तेरे लिए... पहिला पाऊस पडण्याआधी गार वारा सुटला की घर, ऑफिस, हॉटेल, प्रवासात कुठेही असले तरी ही मंडळी खिडकीत जाऊन अगदी शून्य नजरेने त्या वाऱ्याचा आस्वाद घेतात. मग जसजसा पाऊस बरसतो तसतसे हे त्या दिवसांत रमतात, आजूबाजूला कुणी नसलं तर ओठांवर एखादी कविता, गाण्याची ओळ अगदी सहज येते. एवढंच कशाला जेव्हा जेव्हा पानगळ होते तेव्हा तेव्हा हे ‘जख्मी दिल’ भर उन्हात त्या पिवळ्या पानांकडे मोठ्या आसुसलेल्या नजरेनं पाहतात. मग हळूच त्याच्या किंवा तिच्या आठवणींचा कप्पा उघडला जातो, त्यात आणखी भर टाकण्यासाठी लता, रफीचं दर्दभरे गीत ट्यून केलं जातं, ते जपून ठेवलेलं पत्र, जुन्या पिवळसर झालेल्या कागदात दुमडून ठेवलेला तो पासपोर्ट साइजचा फोटो...असं सगळं जसजसा पावसाचा जोर वाढतो तसतसं बाहेर येतं. तिची आणि त्याची ती पहिली भेट, सोबत पीलेला तो पहिला चहा, तो बसप्रवास, अभ्यासाच्या वहीत जाळी होईपर्यंत जपून ठेवलेलं ते पिंपळाचं पान, हे सगळं आठवतं.
पहिलं प्रेम प्रत्येकालाच आयुष्यभरासाठी मिळालेलं नसतं. कधी ‘तो’ समाजाच्या रुढी परंपरांमध्ये अडकतो तर कधी ‘ती’ चुकीचं पाऊल टाकायचं नाही अशी खूणगाठ बांधून त्याचा निरोप घेते, कधी एकमेकांचं वय आडवं येतं, तर कधी जात. मात्र तरीही ‘तो’ आणि ‘ती’ जेथेही असतील तेथे कधीतरी कातरवेळी एकमेकांना साद घालतात. तर काहींचं पहिलं प्रेम पत्नी, पती म्हणून सोबतच असल्याने त्यांच्या आठवणींचा हिंदोळा तर बहरत जातो.
प्रेमरूपी वाऱ्याची झुळुक प्रत्येकाला कधी ना कधी स्पर्श करतेचं.फरक इतकाचं की ही झुळूक येताचं कुणी स्वार्थाने तर कुणी निस्वार्थाने प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलतो. कुणाचा हिंदोळा मध्येच थांबतो तर कुणी शेवटच्या श्वासापर्यंत त्यावर झुलतो.किसी डगर मे,किसी सफर मे हो जाता है.... किंवा ना उम्र की सीमा हो....म्हणत
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणूसरूपी समुद्रातील तीची त्याची भेट असते. भेटीचा हळूहळू सागर बनतो.पुर्वी कठोर राहणारे मन एकमेकांची वाट बघते.मनाची स्वयंभू नदी प्रेमरूपाने वाहू लागते.
मग काय ..?? हमे तुमसे प्यार कितना ...चा सिलसिला सुरू होतो. प्रेमाची झुळूक प्रत्येकाकडं कायमची राहीलचं असं होत नाही. निस्वार्थ भावनेने प्रेम केल तर हसण-रूसण-एकमेकांना जपण हेच असतं स्वार्थ म्हटला तर तू हा कर,या ना कर तू है मेरी... अशी जबरदस्ती किंवा मी प्रेम केलं,त्याने प्रेम केल तूमचं काय गेल ? अशी अरेरावी करून प्रेम या पवित्र शब्दाला समाजात गालबोट लावण्याचं कामं केल जात.
निस्वार्थ प्रेमाच्या आठवणी जगण्याची उमेद देतात.दडलेला रम्य भूतकाळातल्या आठवणींनी प्रेमाच्या माणसांसाठी मन हुरहूरतं.
आज प्रेमाच्या नावाखाली केला जाणारा टाईमपास बघितला की मन मात्र सुन्न होतं.
व्हँलेटाईन डे सप्ताह सुरू असतांना अनेक प्रकारच्या घटना घडतात.
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी असा काही बनाव रचला की, संपूर्ण गाव दहशतीत आले होते. तिने आपल्या मागे सापाची कात सोडून स्वतः 'नागीण' बनल्याची अफवा पसरवली.तरुणीने जाणीवपूर्वक सापाची कात मिळवून ती बेडवर ठेवली होती. तिला माहित होते की, ग्रामीण भागात अशा गोष्टींवर लवकर विश्वास ठेवला जातो. जेणेकरून लोकांनी तिच्या बेपत्ता होण्याला 'रहस्यमयी' वळण द्यावे आणि तिचा शोध घेऊ नये.
नागीण' नाही, तर प्रेमाचा अँगल
फफूंद पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा या प्रकरणातील 'फिल्मी' सत्य समोर आले. पोलिसांना खोलीत कोणत्याही संघर्षाच्या खुणा आढळल्या नाहीत. तपासात समोर आले की, तरुणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबाचा या लग्नाला विरोध असल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
तर अवघ्या सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने शिक्षकांवरच जीव जडल्याचे पत्र लिहून घरातून निघून गेली, अत्याचार क्रृरता अमानूषतेची परीसीमा गाठणारे असे अनेक प्रकार शहरीच नव्हे तर ग्रामिण भागात तसेच आपल्या सभोवताल घडतांना दिवसागणिक पाहावयास मिळतात.हे प्रेम नसून जीवनाशी खेळ तरूण तरूणींनी चालवला आहे. शाळा महाविद्यालये जणू प्रेमाची तिर्थक्षेत्रच बनल्याचे भासते.घडणाऱ्या प्रकारांमूळे युवक युवतींची जीवनाची होणारी राखरांगोळी,करिअर घडवण्याच्या वयात प्रेमाखातर बळी पडणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे याला कोठेतरी आळा बसणे गरजेचे आहे.यावर गांभीऱ्याने विचार केला गेला नाही तर या वेदनांचा अंत कधीच होणार नाही.हीच वेळ आहे पालकांनी समाज बांधवांनी व सामाजिक संस्थांनी एकत्र येवून युवक युवतींचे भविष्य सांभाळण्याची!
नको त्या वयात नको त्या गोष्टी, भरकटलेल्या मुलांचा सहवास, मग आपली असंयमी रानटी वासना भागवण्यासाठी भक्ष शोधून प्रेमाच्या नावाखाली त्यावर तूटून पडतात परिणामाची किंवा जीच्यावर प्रेम करतो तीच़्या मनाची जराही चिंता नसतेच फक्त मला काय हव ते ओरबडून घेण्यातच राक्षसी आनंद व बेफिकीर वृत्ती बनलेली असते.स्त्रीवर होणारा शारीरिक मानसिक ,भावनिक सामाजिक आघात याबद्दल तर खंत नाहीच.विकृत स्वरूपात चित्रफिती पाहून मुलांच़्या अमानुषपणे उद्रेक होवून प्रेमाचा खेळ बनतो.हीच वेळ आहे शरिरीक ज्ञान व आपले शारीरिक आरोग्य या विषया अंतर्गत शास्त्रोक्त माहिती मुला मुलींना देण्याची.अन्यथा प्रेमाच्या पवित्र शब्दाला काळीमा फासणाऱ्या मंडळींमूळे निस्वार्थ व प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्यांवर देखील विश्वास बसणे कठीण होईल. आज प्रेमाची परिभाषाच बदलली की काय, असा प्रश्नच पडतो. तू नही तो और सही, सकाळी एक संध्याकाळी दुसरी. व्हॉट्स ॲप चं स्टेटस बदलावं तसं प्रियकर प्रियसी बदलतात, काळ बदलला तसं प्रेम ही बदललं हेचं कटु वास्तव होय.परंतू आज अनुभवातील प्रेमाच्या आठवणीत कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या वहीतील दुमडलेली पानं पुन्हा एकदा चाळली जातील. जमतील तितक्या आसवांच्या बदल्यात या आठवणींच्या शिदोरीतून एक ऊर्जा, एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा एकदा सगळे धावत्या आयुष्याला सामोरे जातील.असं करतांनाही आठवणी, दुरावलेल्या प्रेमाच्या माणसांसाठी मन हुरहूरेल. आजच्या या व्हॅलेंटाइन डे ला अनेकांना आठवेल पहिलं खरं प्रेम...
मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या वेदना भळभळतील.जपलेल्या वस्तू . चाळतं ती अथवा तो यशस्वी झाला म्हणून आपसूकचं आनंदअश्रृ गालावर ओघळून एक दीर्घ श्वास घेत पुन्हा एकदा धावत्या आयुष्याला सामोरे जाण्यास सज्ज होतील.
कुणीतरी आपलं हक्काचं सतत आपल्या सोबत असावं, सुख-दु:खात पाठीशी राहील अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येक जण असतोच, फरक एवढाच काही तात्पुरती सोबत शोधतात तर काही लग्न गाठ बांधून थांबत. तेव्हा प्रत्येकाच्या ओठी एकच सूर असतो, ‘आय अँम इन लव्ह..’ मग काय सगळीकडे फुलांचे मळे, पाखरांचे थवे, ते मखमली झुले आणि निळ्याशार आकाशात उंचच उंच भरारी घेणारे प्रेमपक्षी, सभोवताली पसरलेलं ते गार पाण्याचं तळं, त्या तळ्यात पाय बुडवून दवबिंदू पडलेल्या काठावरच्या गवताच्या पात्यांवर हळूवारपणे हात फिरवीत बसलेला ‘तो’ आणि ‘ती’. अनेक जण हाताच्या बाह्या खोसत आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण नको म्हणत व्हॅलेंटाईन डे ला विरोध करतील परंतु आठवणी आणि प्रेम थांबणार..? नाही ना..!! क्यु की, आज की बात ही कुछ और है....!
:
Post a Comment
0 Comments