निवृत्तीवेतनधारकांसाठी आज सायबर सुरक्षा जनजागृती शिबिर; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 12, 2026

निवृत्तीवेतनधारकांसाठी आज सायबर सुरक्षा जनजागृती शिबिर;

 


उपस्थित राहण्याचे जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुरक्षित व्यवहार करता यावेत यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई व सी-डॅक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी आज शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता 'सायबर सुरक्षा जनजागृती' विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये डिजिटल युगात वावरताना, विशेषतः बँक व्यवहार आणि ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांना या मार्गदर्शनाचा लाभ घेता घ्यावा. कोषागार कार्यालयाच्या प्रांगणातील 'जिजाऊ सभागृह' येथे आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

अमरावती कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages