स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 12, 2026

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ



अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org  वर उपलब्ध आहे.

परिपूर्ण कागदपत्रासह विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी  2026 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँक तपशील भरून घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages