शुक्रवारपर्यंत 'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

शुक्रवारपर्यंत 'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदत


अमरावती, दि. ०४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारीपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी, विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेणेसाठी कार्यशाळेचे आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे करण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages