प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, January 26, 2026

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण






अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी दिली. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते जिल्हा शोध व बचाव पथकात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यात अमरावती (ग्रामीण) पोलीसातील दीपक पाल, दीपक डोरस, सचिन धरमकर, सुमित बांबल आणि गजानन वाडेकर, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ मधील विशाल निमकर, भूषण वैद्य, देवानंद भुजाडे, आकाश निमकर, अर्जुन सुदंल्डे आणि गणेश जाधव, मनपा अग्निशामक विभागातील सुशांत तायडे, सुरेश पालवे, जिल्हा होमगार्डमधील अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, सूरज ठाकूर, सागर माहुलकर आणि दीपक चिल्लोरकर यांचा समावेश आले.

यावेळी उपस्थितांना कृष्ठरोग निर्मूलनाची शपथ देण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, दुर्गा देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा सूचना अधिकारी मनीषकुमार, तहसीलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages